*कोकण Express*
*कणकवली पं. स. अंतर्गत समुपदेशनातून 15 कर्मचाऱ्यांची झाली बदली*
*13 प्रशासकीय तर 2 विनंती बदल्यांचा समावेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका पं. स. अंतर्गत समुपदेशनाद्वारे शिक्षकेतर एकूण 15 कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया आज सुरळीत पार पडली. सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती प्रकाश पारकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया पार पडली. प्रशासकीय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 4 महिला आरोग्य सेविका, 2 पुरुष आरोग्य सेवक , 1 स्त्री परिचर, 1 केंद्रप्रमुख , 1 ग्रामविकास अधिकारी , 4 ग्रामसेवक यांचा समावेश आहे. तर 2 ग्रामसेवकांची विनंती बदली करण्यात आली.