*कोकण Express*
*संजय गांधी निराधार योजना समिती सभेत आचरा येथील ९ प्रकरणे मंजूर*
मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या तथा आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संजय गांधी निराधार योजना समिती सभेत आचरा येथील ९ प्रकरणे मंजूर करून घेतली. मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत मालवण तालुक्यातील एकूण ४१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये समिती सदस्य तथा आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये आचरा येथील सारा जयप्रकाश जाधव, रेश्मा रामदास कांबळी, रमिता करुणाधन जोशी व रोजालीन जॉर्ज फर्नांडिस हि ४ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना यामध्ये सुहासिनी मधुकर आचरेकर हे १ प्रकरण, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ) मध्ये सुहासिनी मधुकर आचरेकर हे १ प्रकरण तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना(गट ब)मध्ये सुशीला सीताराम बांदेकर, सीताराम गोविंद बांदेकर, आबा सखाराम गावकर हि ३ प्रकरणे अशी एकूण आचरा येथील ९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी अनुष्का गावकर यांचे अभिनंदन केले आहे.