विलास साळसकर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

विलास साळसकर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

*कोकण Express*

*विलास साळसकर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर*

*देवगड बँक ऑफ इंडिया च्या शाखेत मराठी भाषेचा वापर करा*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे सरकारी – निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठी, हिंदी , इंग्रजी यांचा उल्लेख असला पाहिजे. बँक ऑफ इंडिया शाखेतील ग्राहकांसाठी पैसे भरणे आणि पैसे काढण्यासाठी जी पावती उपलब्ध आहे. या पावती मध्ये ग्राहकांच्या माहितीकरिता जे लिखाण केले आहे ते लिखाण हिंदी, इंग्रजी मध्ये आहे. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर आक्रमक झाले. यासंबंधी त्यांनी निवेदन देवगड बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापकांना दिलंय.

निवेदनात ते म्हणाले, आपल्या शाखांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमाचे व मराठी भाषेचा अपमान झाल्याचे उघड केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. वरील बाब आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ आपण यात बदल करून ग्राहकांना सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात. येत्या आठ दिवसात आम्ही केलेल्या सूचनेची आपल्या स्तरावर अंमलबजावणी न केल्यास आपणास कुठलीही पुर्व सूचना न देता देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने आपल्या शाखेसमोर उग्र आंदोलन करून सर्व उपलब्ध असलेल्या पावत्यांची होळी करण्यात येईल. व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, युवा अध्यक्ष निनाद देशपांडे, शहराध्यक्ष संतोष तारी, व विभाग अध्यक्ष पीटी पेडणेकर यांच्या वतीने देवगड बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!