उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात N95 दर्जाचे मास्कचे वाटप

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात N95 दर्जाचे मास्कचे वाटप

*कोकण  Express*

*उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात N95 दर्जाचे मास्कचे वाटप..*

*राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या पुढाकाराने जिल्हा राष्ट्रवादी महिला संघटनेच्या वतीने महिला जिल्हा अध्यक्षा सौ. रेवती राणे ताई यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांनसाठी व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, व इतर स्टाफ यांच्यासाठी N95 दर्जाचे मास्क जिल्हा शल्यचिकित्सक ड़ॉ श्री श्रीपाद पाटिल व ड़ॉ श्री श्याम पाटिल यांच्याकड़े सुपुर्द करण्यात आले
त्यावेळी ड़ॉ श्रीपाद पाटिल यांनी मास्क दिल्याबद्द्ल आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला माजी आकेरी सरपंच संदीप राणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ नीलम वर्णे कणकवली महिला तालुका अध्यक्षा सौ स्नेहल पाताडे माजी उपसभापति आर. के. सावंत, माजी राष्ट्रवादी जिल्हा ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़ कणकवली राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर गणेश चौगुले सचिन सदडेकर विशाल ठाणेकर शिवडाव मा उपसरपंच सतीश पाताडे तनया देसाईंनी व आरोग्य कर्मचारी बंड्या बिनसाले आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!