*कोकण Express*
*तोंडवलीत शिवसेनेला मोठा धक्का*
*माजी सरपंच उमेश कुडतरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी गावचे माजी सरपंच , संदेश पारकर प्रेमी आणि शिवसेनेचे कट्टर समर्थक उमेश कुडतरकर यांनी पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्या अंकीता कुडतरकर, समिर तावडे, निळकंठ कुडतरकर यांच्यासह आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. उमेश कुडतरकर हे शिवसेना नेते संदेश पारकर यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तोंडवली येथे खळबळ उडाली असून शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, सभापती मनोज रावराणे, भाजपचे तालूकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती दिलीप तळेकर, सरचिटणीस पंढरी वायंगणकर, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे, रविंद्र बोभाटे, दिनेश कांडर, अमित सदडेकर, योगेश सदडेकर, आनंद मोरजकर, सचिन गावडे, सचिन गुरव आदी उपस्थित होते.