*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी झाला साजरा*
*आरोग्य केंद्रास ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर, बेड,छञी वाटपासह कोव्हिड योद्धांचा करण्यात आला सन्मान*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
*महाराष्टाचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त सकाळी दत्त मंदिर वैभववाडी येथे अभिषेक सोहळा संपन्न झाला.
तर दुपारी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व बेड देण्यात आले.
असून दुपारी वैभववाडी पंचायत समितीच्या सभागृहात शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या सौजन्याने कोरोना काळात प्रामाणिक व उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कोव्हिड योद्धा म्हणून व पञकार यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी छत्री वाटपाचा कार्यक्रमही पार पडला.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर,तालुका प्रमुख मंगेश लोके ,जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी शहर प्रमुख प्रदिप रावराणे, युवासेना जि. सरचिटणीस स्वप्नील धुरी, अशोक रावराणे,अंबाजी हुबे, जितेंद्र तळेकर,जावेद पाटणकर, गौस पाटणकर,विठोबा गुरव आदि पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.