*कोकण Express*
*सावंतवाडी शहर भाजपा युवक अध्यक्षपदी संदेश टेमकर यांची निवड*
सावंतवाडी भाजपा शहर युवक मंडल अध्यक्षपदी झिंरगवाडी मधील संदेश पांडुरंग टेमकर याची आज निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह जिल्हा सरचिटणीस सौरभ गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंधावळे, केतन आजगावकर, अमित परब , भूषण आंगचेकर, तुषार साळगावकर आदी उपस्थित होते.यावेळी सौरभ गावडे म्हणाले ,सावंतवाडी शहर मंडल युवक अध्यक्षपदी संदेश टेमकर यांची आज निवड करण्यात आली आहे तसेच प्रभारी भूषण आंगचेकर व तुषार साळगावकर हे शहर युवक कार्यकारणी आणि संघटना बांधण्यासाठी योग्य अहवाल देतील असे त्यांनी सांगितले. युवक काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले
यावेळी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, संदेश टेमकर हे मागील सात ते आठ वर्ष संघटनात्मक काम करत आहेत नगरसेवक राजू बेग आणि नगराध्यक्ष निवडणुकीत मला त्यांनी विजयी करण्यासाठी योगदान दिले आहे माझ्या निवडणुकीत प्रभाग ४ मध्ये ८५ मते अपेक्षेपेक्षा जास्त पडली त्यासाठी संदेश टेमकर या तरुणाने संघटनकौशल्य आणि अभ्यास करून निवडणुकी तंत्र वापरले या पुढील निवडणुकीत भाजपाला विजय हवा म्हणून युवक शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी त्याच्यावर टाकली असून भाजपची युवा ताकत शहरात बांधणीसाठी तो प्रयत्न करेल असा विश्वास नगराध्यक्ष परब यांनी व्यक्त केला