*कोकण Express*
*आडवली मालडी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न*
*विभागप्रमुख पदी बंडू चव्हाण, विभाग संघटक पदी संतोष घाडी,रामगड शाखाप्रमुख पदी रामू सादये यांची निवड*
*मालवण ः प्रतिनिधी*
आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघात आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले.शिवसंपर्क अभियानांतर्गत हिवाळे व रामगड येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांना संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आडवली मालडी विभागप्रमुख पदी बंडू चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर विभाग संघटक पदी संतोष घाडी, व रामगड शाखा प्रमुख पदी रामू सादये यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी हिवाळे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबा सावंत, विभागप्रमुख बंडू चव्हाण, सुभाष धुरी, अंबाजी सावंत, सुभाष घाडी, सुनील सावंत, सचिन परब, उत्तम गावकर, युवराज मेस्त्री, बंडू कासले, रमेश गावकर, स्वप्नील पुजारे
रामगड येथे विभाग संघटक संतोष घाडी, सरपंच विलास घाडीगावकर, किर्लोस सरपंच बंडू सावंत, दुलाजी परब, बंडू सावंत आदी उपस्थित होते.