मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर शिवसेनेतर्फे विविध उपक्रम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर शिवसेनेतर्फे विविध उपक्रम

*कोकण  Express*

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर शिवसेनेतर्फे विविध उपक्रम*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 27 जुलै रोजी कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व खासदार विनायक राऊत जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच कणकवली स्वयंभू मंदिर येथे 27 रोजी सकाळी 8 वा. दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते हा दुग्धाभिषेक होणार असून, यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत व शिवसेना पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नगरसेवक गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शहर प्रमुख शेखर राणे यांनी केले आहे. शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. 17 प्रभागात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच अतुल रावराणे यांच्या माध्यमातून मोफत छत्री वाटप व भैरीभवानी प्रतिष्ठान च्या माध्यमातून शहरातील शेतकऱ्यांना मोफत काजू कलमाचे वाटप देखील केले जाणार आहे. या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कणकवली शहरातील 17 प्रभागांमध्ये आतापर्यंत नागरिकांना झालेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसी ची माहिती संकलित करण्यात येणार आहे. व जे नागरिक अजून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली शिवसेने मार्फत शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ 27 जुलै रोजी सायंकाळी 4 वा. करण्यात येणार आहे.

शिवसंपर्क अभियानाचे प्रभाग निहाय नियोजन खालील प्रमाणे

27 जुलै

1) नाथ पै नगर, एसटी कॉलनी (सायंकाळी 4 वा. शुभारंभ. (योगेश मुंज)

2) शाळा नंबर 5 – (4.30 वा.) नगरसेवक रुपेश नार्वेकर.

3) परबवाडी – (5 वा.) भिवा परब

4) शिवाजीनगर – (5.30 वा) सोहम वाळके, मेघन मुरकर, गुरु नाईक

5) कनकनगर – (6 वा) बाबु जाधव

6) बांधकरवाडी – ( 6.30 वा) रवी राणे, सुमित राणे

7) वरचीवाडी – (7 वा.) साक्षी आमडोसकर, राकेश पीळणकर

8) बिजलीनगर – (7.30 वा) नगरसेवक सुशांत नाईक, प्रतिक्षा साटम

28 जुलै रोजी

1) वार्ड नंबर एक- (4 वा) तेजस राणे

2) बौद्धवाडी – (4.30 वा) भाई जाधव, महेश राणे

3)बाजारपेठ – (5 वा) सुनील पारकर

4) बाजारपेठ – (5.30 वा) प्रसाद अंधारी, आदित्य सापळे

5) हर्णे आळी – (6 वा) गौरव हर्णे

6) टेंबवाडी – (6.30 वा) वैभव मालडकर

7) गंगोवाडी – (7 वा) भूषण परुळेकर, विलास कोरगावकर

8) सोनगेवाडी – (7.30 वा) सुजित जाधव, संतोष पुजारे

9) विद्यानगर- (8 वा) नगरसेवक कन्हैया पारकर, अश्विनी मोर्ये.

असे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून, कणकवली शहरातील शिवसैनिक, पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नगरसेवक गटनेते सुशांत नाईक नगरसेवक कन्हैया पारकर व शहर प्रमुख शेखर राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!