*कोकण Express*
*घोणसरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत जायफळ कलमांचे वाटप*
*जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते संपन्न*
*घोणसरी ःःसंजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते घोणसरी येथे झाले. सोबत जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, राजू राणे, बंडू ठाकूर, सुभाष वरवडेकर, शाखाप्रमुख मंगेश राणे, उपविभागप्रमुख रवींद्र शिंदे, सोसायटी चेअरमन रामा इंदुलकर, सचिन मेस्त्री, संदीप सुतार, विजय मराठे, प्रसाद राणे, युवा सेना दर्शन मराठे, उदय राणे व पदाधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले.