*“मल्हारी’ पूलाच्या ठिकाणी साकव करून तात्पुरत्या स्वरूपात रहदारी सुरू करणार*
*आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून निघाला मार्ग**कणकवली ः संजना हळदिवे*कणकवली तालुक्यातील कनेडी – नाटळ मार्ग जोडणारे मल्हारी पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोबत घेत आम.वैभव नाईक यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. व तात्काळ उपाययोजना म्हणून या कोसळलेल्या पूलाच्या ठिकाणी साकव करून तात्पुरत्या स्वरूपात मोटारसायकल व चालत जाणाऱ्या लोकांची रहदारी सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या सूचना नाईक यांनी दिली. या मागणीला पालकमंत्री सामंत व जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नाईक यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील कनेडी – नाटळ मार्ग जोडणारे मल्हारी पूल कोसळल्यानंतर या घटनेची आमदार वैभव नाईक यांनी रविवारी पाहणी केली. व यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधत यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानुसार मल्हारी पुल कोसळल्याने या मार्गातील पाच गावाचा संपर्क तुटला आहे. मात्र या भागातील जनतेच्या सोईच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून तात्काळ मार्ग काढण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, सा बा चे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे आदी उपस्थित होते.