बांद्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली नुकसानग्रस्त घरांची पाहणी!

बांद्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली नुकसानग्रस्त घरांची पाहणी!

*कोकण  Express*

*बांद्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली नुकसानग्रस्त घरांची पाहणी!*

*जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलं ताडपत्रीचे वाटप!*

*बांदा ः प्रतिनिधी*

बांदा परिसरात मुसळधार पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांदा येथे येत केली पहाणी यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे बांदा शहरात अनेकांच्या घरात पाणी जाऊन मोठ्या नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने होत्याचे नव्हते झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पुंडलिक दळवी यांच्या सोबत बांदा येथे येत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त घरांना ताडपत्रीचे वितरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!