*कोकण Express*
*अतुल रावराणे धावले कोर्ले, धालवली, पोंभुर्ले वासीयांच्या मदतीला*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी देवगड तालुक्यातील पूरग्रस्त कोर्ले, धालवली, पोंभुर्ले परिसराला भेट देत पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत केली. देवगड तालुक्यातील पोंभुर्ले कोर्ले धालवली परिसरात अतिवृष्टीने कहर केला असून नागरिकांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. शेती पाण्याखाली जाऊन भातशेती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी स्वतः तात्काळ या भागात जाऊन पुरस्थितीची आणि अतिवृष्टीने झालेल्या हानीची पाहणी केली. कोर्ले गावातील बाणे यांच्या घराची पडवी कोसळून नुकसान झाले होते. अतुल रावराणे यांनी स्वतःच्या खिशात हात घालत बाणे यांना लागलीच आर्थिक सहाय्य केले. धालवली येथील मुस्लिम वस्तीत पाणी घुसले होते. त्या ठिकाणी जात पाहणी करून तात्काळ तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना सांगून मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांचे लगतच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. यावेळी देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.