*कोकण Express*
*महसूल,ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार हे शनिवार दि.३१ ऑक्टोबर ते रविवार १ नोव्हेंबर २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्यात विविध नियोजित कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.तसेच अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांचा आढावा घेणार आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
ना.अब्दुल सत्तार यांचा सिंधुदुर्ग दौरा पुढीलप्रमाणे, शनिवार दि.३१ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी २.०० वाजता रत्नागिरी पाली येथून कुडाळकडे प्रयाण,सायंकाळी ५.०० वा.कुडाळ येथे अगमन व त्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या समवेत कुडाळ मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमांस उपस्थिती,त्यानंतर अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत कामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. रात्रौ ९.०० वाजता कुडाळ येथून शासकीय विश्रामगृह सावंतवाडीकडे प्रयाण व राखीव.
रविवार दि.१ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० वा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर सोयीनुसार सावंतवाडी वरून पणजी गोवा कडे प्रयाण करणार आहेत.