पावसाच्या रुद्ररुपाने कुडाळ तालुक्यात हाहाकार

पावसाच्या रुद्ररुपाने कुडाळ तालुक्यात हाहाकार

*कोकण Express*

*पावसाच्या रुद्ररुपाने कुडाळ तालुक्यात हाहाकार*

*तर कुडाळत पावशी येथे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी*

*कुडाळ ःप्रतिनिधी*

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणा-या पावसाने कुडाळ शहर आणि तालुक्यला चांगलाच तडाखा दिला आहे. कर्ली आणि भंगसाळ नदीला पूर आला असून शहराला लगन असलेली गावे जलमय झाली आहेत. शहर परिसरातील अनेक इमारतींच्या पहिल्या मजल्या पर्यंत पाणी पोहोचले आहे.

कुडाळ शहरा नजीक असलेल्या पावशी गावाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. पावशी गावातील काही वाड्या जलमय झाल्या  आहेत. भंगसाळ नदीचे पाणी अनेक वस्त्यांत घुसल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तर पावशी सातेरी मंदिर येथे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आलेले आहे त्यामुळे सर्व वाहतूक ठप्प झालेली आहे

सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पड्ली आहे. वहातूक बन्द असून आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाले आहे. दरम्यान काही उत्साही तरुण ठिकठिकाणी पुराची दृष्ये टिपताना दिसत होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती गम्भीर स्वरुप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!