*कोकण Express*
*गावाने गाववाल्यांसाठी निर्माण केला आदर्श जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांचा अभिनव उपक्रम*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कोरोनाच्या आपत्तीने विश्र्व बदलले.अनेक चेहरे उघडे पडले.मदतीचे हात पुढे सरसावले.कोरोनावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू झाले.जांभवडे पंचक्रोशीत कोरोना वाढत होता.वाहतुकीची सुविधा नव्हती,गरीब जनतेला भाडे परवडणारे नव्हते.यामुळे गावातील म़ंडळींनी पुढाकार घेत एक संकल्प केला.प्रामुख्याने कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री.वामन तर्फे, वैद्यकीय सेवादेत सामाजिक कार्यात सहभागी असणारे डॉ.प्रशांत मडव,घोटगे सरपंच श्री अमोलतेली,श्री.शिवाजी मडव गुरुजी,श्री.धोंडु रेडकर सर,श्री.दिलीप कदम गुरुजी यांनी यात पुढाकार घेतला आणि जांभवडे पंचक्रोशीतील (जांभवडे,सोनवडे,घोटगे,भरणी,कुपवडे) नागरिकांसाठी लोकसहभागातून कायमस्वरूपी अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.यासाठी कोविड१९योद्धा मित्र ग्रुप, जांभवडे पंचक्रोशी शिक्षक ग्रुप ट्रस्टचे विश्वस्त कार्यरत झाले आणि कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी सुरुवात झाली.जांभवडे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, मुंबई,पुणे, कोल्हापूर व अन्य शहरांतील चाकरमानी यांनी सढळ हस्ते आर्थिक सहाय्य दिले आणि आज ही संकल्पना पुर्णत्वास गेली यात पंचक्रोशीतील नागरिक, मुंबईतील व स्थानिक मंडळे,न्यु शिवाजी हायस्कूल जांभवडेचे माजी विद्यार्थी ग्रुप सहभागी झाले.या लोकसहभागातून घेतलेल्या अॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा प्रांताधिकारी श्रीमती.वंदना खरमाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.यावेळी कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त व जि.प.सदस्य श्री.नागेश परब,जांभवडे पंचायत समिती सदस्य श्री.बाळकृष्ण मडव,सर्व सरपंच, उपसरपंच,श्री.पी वरही काजरेकर सर,श्री.शांताराम परब,कोव्हीड१९ग्रुपचे सदस्य,जांभवडे पंचक्रोशी शिक्षक ग्रुपचे सदस्य,ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिलीप कदमसर यांनी केले,प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव श्री.वामन तर्फे यांनी केले.डाॅ.प्रशांत मडव,श्री.नागेश परब, प्रांताधिकारी श्रीमती.वंदना खरमाळे मॅडम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्री.श्रीपाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सर्व मान्यवरांचे व देणगीदारांचे श्री.अमित मडव यांनी आभार मानले.श्री समर्थ महापुरुष मंडळ शेट्येवाडीच्या कार्यकर्त्यांनी श्री.श्रीकांत खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.