*कोकण Express*
*दळवी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनास मा. मुख्यमंत्रांचे शिक्षक प्रा. नरेंद्र विचारे प्रमुख पाहुणे*
*भूदाते आनंद महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण*
*तळेरे ः प्रतिनिधी*
कला व सांस्कृतिक धरोहर संगोपन व संवर्धनाचे कार्य दळवी महाविद्यालयात होत असते. याचाच एक भाग म्हणून ‘विजिगीषु’ हा उपक्रम महाविद्यालयात दरवर्षी राबविला जातो. विद्यार्थ्यांचा कलागुणांचा विकास व्हावा, त्यांना युथ फेस्टिव्हल मध्ये यश मिळवता यावे म्हणून सलग पाच दिवस विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे ११ ते १५ जुलै या कालावधीत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात, ‘गार्गी डे’ ने झाली. या दिवशी महिला सबलीकरणावर या विषयावर डॉ. शिल्पा सप्रे (इंग्रजी विभाग प्रमुख डी बी. जे. महाविद्यालय चिपळूण) यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी महाविद्यालय ‘सांस्कृतिक स्पर्धा’, तिसऱ्या दिवशी ‘ आंतर महाविद्यालयीन कीर्तन स्पर्धा’ चौथ्या दिवशी ‘स्थापनादिन कार्यक्रम’ आणि पाचव्या दिवशी ‘जिल्हास्तरीय गायन कार्यशाळा’आयोजित केली गेली, ज्यात पूजा देसाई चाफळकर (विशारद ,शास्त्रीय संगीत) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे भुदाते श्री. आनंद महाडीक यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली. श्री. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालयगीत ओंकार बर्वे यांनी सादर केले. श्री श्रीपाद वेलिंग (प्रभारी संचालक, मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उप-परिसर व समन्वयक) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ‘कोकणात शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असून विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरे यांचे जे. जे. इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट येथील शिक्षक प्रा. नरेंद्र विचारे यांचा परिचय महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी वाडेकर हिने करून दिला. याप्रसंगी प्रा. नरेंद्र विचारे म्हणाले की, “सिंधुदुर्गाने अनेक गुणी कलाकार जगाला दिलेत. या मातीत कस आहे’’
‘’दळवी महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी विजिगीषु बनला पाहिजे. विद्यार्थ्यांनी कला व संस्कृतीच्या माध्यमातून जग जिंकले पाहिजे, निष्ठा व वचनबद्धता अंगी बाणवली पाहिजे. या गुणाने, जगात काहीही मिळवता येवू शकते” असा विश्वास दळवी महाविद्यालयात विजिगिषु संकल्पना रुजवणारे महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी यांनी व्यक्त केला.
‘विजिगीषु’ उपक्रमा निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत.
महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचा निकाल.
शास्त्रीय वाद्य संगीत:
1)रोहित तांबे, टीवाय बीएस्सी आयटी,
उपशास्त्रीय गायन:
1)गौरेश आयरे, एफवाय बीबीआय,
2) निकिता शेलार (एसवाय बी कॉम)
वकृत्व:
दीप्ती वारीक, एसवाय बीएएफ,
कविता वाचन:
वृषाली लालाई, एसवाय बीएएमएमसी,
2) दीक्षा सुतार, टीवाय बीएससी आयटी व
2) वैष्णवी भोगले, टीवाय बीएएमएमसी,
3) श्रावणी मदभावे टीवाय बीएएमएमसी,
सर्जनशील लेखन स्पर्धा:
1) वैष्णवी भोगले टीवाय बीएएमएमसी
2)प्राजक्ता पांचाळ टीवाय बीएससी
3) क्षितिजा तळेकर, टीवाय बीए एमएमसी
नकला:
सत्यवान गावकर, एसवाय बीएएमएमसी
एकपात्री अभिनय:
1)सत्यवान गावकर एसवाय बीए एमएमसी
2)श्रावणी मदभावे टीवाय बीए एमएमसी
चित्रकला:
1)दीप्ती वारीक
2 केतकी रोयागे टीवाय
3)प्राजक्ता पांचाळ टीवाय बीएससी आयटी
पोस्टर मेकिंग:
1)सुचिता विश्वासराव टीवाय बी एससीआयटी
2) तेजस्वी सुतार, एसवाय बीएएफ
3) प्राजक्ता पांचाळ टीवाय बी एससीआयटी
रांगोळी:
1) दीप्ती वारीक: एसवायबीएएफ
2)वैष्णवी भोगले टीवाय बीएएमएमसी
3)अनघा घाडीगावकर, एस वाय बीएएफ
मेहंदी :
1) साक्षी मिठबावकर टीवाय
बीएएमएमसी
2) उमेरा मुजावर, टीवाय बीएससीआयटी
3) कृष्णकुमारी ईसवलकर,
एसवाय बीएससीआयटी
या साठी परीक्षक श्री. प्रथमेश शिवळकर,श्री.रोशन ठीक,श्री.तेजस भोसले, श्री. ओंकार बर्वे होते.
आंतर महाविद्यालयीन कीर्तन स्पर्धा निकाल
मयुरेश जायडे, गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी.
2) मृणाली गावकर, कणकवली कॉलेज कणकवली.
3) अमृता नवते, गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी.
उत्तेजनार्थ अश्विनी अस्वले एसएनडीटी वुमन युनिव्हर्सिटी मुंबई.
यासाठी परीक्षक सायली मुळे (विशारद ,शास्त्रीय गायन) होत्या.
सूत्रसंचालन नरेश शेट्ये ( सहा. प्राध्यापक दळवी
महाविद्यालय ) यांनी केले. महाविद्यालयाचे भूदाते श्री. हेमंत महाडिक ( सहा. प्राध्यापक दळवी
महाविद्यालय ) यांनी आभारप्रदर्शन केले.