*कोकण Express*
◾ *_अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्टला CET; प्रश्नपत्रिकेचं स्वरुप कसं?…_*
◾ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे.
◾ *परीक्षेचे स्वरूप*
● सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत सीईटी होणार आहे.
● ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे एच्छिक असून ती ऑफलाइन स्वरूपाची असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
● CET परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे.
● या परीक्षेसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना bit.ly/3rj42WD या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असून अर्ज भरण्याची सुविधा येत्या मंगळवारपासून (ता.२०) उपलब्ध होणार आहे.
✅ *प्रश्नपत्रिकेचे असे असेल स्वरूप :*
विषयाचे नाव : गुण- इंग्रजी : २५ गुण- गणित (भाग एक आणि दोन) : २५- विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक आणि दोन) : २५- सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल : २५- एकूण : १००
IP
