*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्याबद्दल नारायण राणे यांची दिल्लीत जाऊन घेतली भेट*
*जि.प. सदस्य तथा तालुका सरचिटणीस भाजपा वैभववाडी सुधिर नकाशे यांनी केले अभिनंदन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जि.प. सदस्य तथा तालुका सरचिटणीस भाजपा वैभववाडी सुधिर नकाशे यांनी आज सन्मानीय केंद्रीय उदयोग मंत्री नारायणराव राणे साहेब यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेउन त्यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी नाधवडे येथे महाराष्ट्र शासनाकडे असलेली 28 एकर जमीनीमध्ये भविष्यात प्रदुषण विहरती उदयोग धंदे चालु करण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली . नाधवडे येथे तळेरे कोल्हापूर मुख्य रस्ता लगत महाराष्ट्र शासनाने 30 वर्षा पुर्वी छोटे औद्योगिक वसाहत यासाठी 28 एकर जमीन संपादीत केलेली आहे . या जमीनीवर प्रदूषण विरहीत उदयोग धंदे आले तर या कोरोना काळात मोठ्या प्रमाणात उदयोग धंदे बंद पडल्यामुळे मुंबई स्थितीत युवक गावकडे येणे चालू आहे . त्याच प्रमाणे गावाकडील स्थानिक युवक सध्या मुंबईला न जाता गावा मध्ये थांबतील . या साठी येथे उदयोग चालू होणे गरजेचे आहे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.