*कोकण Express*
*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेचा दहावीचा निकाल १०० %*
*कणकवली ः संजना हळदिवे*
एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२१ मध्ये कोकण विभागीय मंडळाच्या मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर केलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचा निकाल १००% लागला. सदर परीक्षेसाठी प्रशालेचे १२९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १२९ विद्यार्थी पास होऊन शाळेचा निकाल १००% लागला आहे. गवळी रुपेश संतोष ९९.६०% (प्रथम), कु.पेडणेकर दुर्वा दीपक ९७.२० (द्वितीय), पवार साहिल सुनील ९६.२० % (तृतीय)
११ विद्यार्थी ९० व ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले. यावर्षी सुद्धा प्रशालेने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, स्कूल कमिटीचे चेअरमन, खजिनदार तसेच सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यांत आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.