*कोकण Express*
*नांदगाव बिडयेवाडी येथे घरात भरलं पाणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मदार पडणा-या पाऊसामुळे नांदगाव, तळेरेसह परीसरातील अनेक गावात ओढे,नदी नाल्यांना पूर आला असून परीसरातील पियाळी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गासह सर्व्हीस रोडवर ठिक ठिकाणी पाणी साचले असून निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज व गटाराची कामे झाल्याने यामध्ये पाणी साचून महामार्गाशेजारील घरात घुसले आहे. यामुळे परीसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रौद्र रूप धारण केलेला पाऊस रविवारी सुध्दा दमदार पडल्याने नांदगाव, तळेरेसह अनेक भाग दणानूण सोडला. यामध्ये अनेक गावातून जाणारे नदीनाले,ओहोळांना पूर आल्याने अनेक भागातील संपर्क तुटल्याचे समजते. त्याचबरोबर शेतजमिनीत पाणी घुसून शेती बुडाल्याचे निदर्शनास आले. असलदे येथून वाहणारी पियाळी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने परीसरातील शेतीत पाणी घुसले. नांदगाव बिडयेवाडी येथिल निकृष्ट ड्रेनेज व गटार लाईनच्या कामामुळे वारंवार तहसीलदार, प्रातांधिकारी, हायवे प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला सांगूनही कोणतीही सुधारणा झाली नसल्याने गतवर्षीची पुनरावृत्ती होत येथील श्रीम. सुनंदा आत्माराम बिडये, श्री.तेजस संतोष बिडये याच्यासह महामार्गालगत असणा-या अनेक घरे,रस्ता,बागेत पाणी साचून नुकसान झाले. त्याचबरोबर महामार्गासह सर्व्हीस रोडवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. परीसरात दमदार पाऊस लागल्याने महामार्गावर वाहतूक मंदावलेली दिसून आली.