रामेश्वर प्लाझा इमारतीचा तळमजला, पार्किंगमध्ये पुन्हा भरले नाल्याचे पाणी

रामेश्वर प्लाझा इमारतीचा तळमजला, पार्किंगमध्ये पुन्हा भरले नाल्याचे पाणी

*कोकण Express*

*रामेश्वर प्लाझा इमारतीचा तळमजला, पार्किंगमध्ये पुन्हा भरले नाल्याचे पाणी*

*महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना फटका*

*सलग तिसऱ्या वर्षी पाणी भरल्याने नागरीक संतप्त…*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांच्या गलथान कारभाराचा कणवलीकरांना भोगावा लागला आहे. कणकवली शहरात यावर्षी सलग दुसऱ्यांदा रामेश्वर प्लाझा इमारतीच्या पार्कींग व तळमजल्यावर पाणी भरले. गेले तीन-चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लगतच्या नाल्यांमध्ये पाणी आले होते. मात्र गोकुळधाम हॉटेलच्या बाजूला पाणी विसर्ग होत असलेल्या तोंडावर महामार्ग ठेकेदारांने काम व्यवस्थित न केल्याने त्याचा फटका रामेश्वर प्लाझातील रहिवाशांना बसत आहे.

चालू वर्षी सुरुवातीला एकदा पाणी तुंबले.त्याकडे महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदाराणे दुर्लक्ष केला आहे.त्यामुळे पुन्हा पाणी थेट रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये घुसल्याने वाहने पाण्यात अडकली होती.सायंकाळी ५ वाजल्यापासून रहिवाश्यांनी जीव मुठीत धरुन आपली वाहने पार्किंग मधून बाहेर काढली.

कणकवली महामार्ग उड्डाणपुलाचे काम आटोपल्यानंतर कणकवली शहरातील गटारे व नाले विसर्ग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज होती. मात्र ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने काम संपल्याने पोबारा केला आहे. त्याचा फटका या ठिकाणी पहिल्याच पावसात या भागातील नागरिकांना बसला आहे. त्याचबरोबर अन्यही कणकवली शहरातील नाले गटारे अर्धवट टाकून या दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला आहे. अनेकदा सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवून देखील त्याकडे दुर्लक्ष करत हा कंपनीचा ठेकेदार प्रसार झाला आहे.

पाणी भरले त्यावेळेस रामेश्वरला प्लाझा रहिवासी डॉ.अशोक कदम,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,वकील पी.एन.कुलकर्णी,शिवाजी कासले, सुनील कदम, अमित दळवी आदीनी आपली वाहने बाहेर काढली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!