कुवळ्यात पावसाचा हाहाकार शेती गेली पाण्याखाली

कुवळ्यात पावसाचा हाहाकार शेती गेली पाण्याखाली

*कोकण Express*

*कुवळ्यात पावसाचा हाहाकार शेती गेली पाण्याखाली*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

गेले 4 दिवस कोकणात मुसळदार पाऊस पडत आहे. कित्येक नद्यांना पूर देखील आला आहे. त्यातच आज सकाळी पासून पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे देवगड तालुक्यातील कुवळे गावाला पावसाने चांगलंच झोडपले आहे. कुवळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे .नदीच पाणी शेतात शिरल्याने भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
कुवळे गावातील तर्फेवाडी, परबवाडी, आगरवाडी या वाडीतील शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. पाण्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून सरकाने/ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!