*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात सर्वाधिक ५८ मि.मी. पाऊस…*
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ४४.२० मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात ५८ मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी २०५०.४८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 28(2012), सावंतवाडी – 25(2221.10), वेंगुर्ला – 50.60(1767.80), कुडाळ – 40(1965), मालवण – 49(2470), कणकवली – 58(2101), देवगड – 51 (1842), वैभववाडी – 52(2025), असा पाऊस झाला आहे.