*कोकण Express*
*आमदार दीपक केसरकर आपल्या नाकर्तेपणाच खापर फोडतात अधिकऱ्यावर..*
*घरी बसविण्याची भाषा करणाऱ्या केसरकरांनी स्वतः राजीनामा देऊन घरी बसावे..*
*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी*
*दोडामार्ग ः प्रथमेश गवस*
आमदार दीपक केसरकर आपल्या नाकर्तेपणाच खापर अधिकऱ्यावर फोडत आहेत. त्यांना घरी बसविण्याची भाषा करणाऱ्या केसरकरांनी स्वतः राजीनामा देऊन घरी बसावे. एखाद्या कार्यक्षम व्यक्तीला तरी काम करण्याची संधी मिळेल, अशी टीका भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
अलीकडेच आपण आणलेला निधी आळशी व अकार्यक्षम अधिकाऱ्यामुळे खर्च झाला नाही अशी खंत आमदार केसरकर व्यक्त करत आहेत. सासोली येथील शिवसपर्क अभियानाच्या मेळाव्यात पालकमंत्र्याकडे त्यानी अधिकाऱ्यांना घरी बसवा, अशी विनंती केली होती. यावर श्री. नाडकर्णी नी टीका केली.
ते म्हणाले, केसरकर जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी नवनवीन तंत्र आणतात. आता आपल्या अपयशाच खापर ते अधिकाऱ्यावर फोडत आहेत. केसरकर तुम्ही मंत्री म्हणजे मालक होता. आपल्या हाताखालच्या अधिकारी -कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी तुमची होती. त्यांनी काम केली नाहीत म्हणजे तुम्ही बेजबाबदार होता. आता त्यांच्या अकार्यक्षमतेवर बोलून त्यांना घरी पाठवण्याची धमक्या देत आहात. प्रेमाने जग जिंकता येत असा सुविचार तुम्हीच या प्रशासनबद्दल सांगत होता. मग मंत्री असताना तुम्ही प्रेमाने वागून काम का करून घेतली नाही. जनतेला जाऊन विचारा प्रेमाने बोलून साधा सात बारा उतारा तरी शेतकऱ्याला मिळतो का.?
आज अधिकाऱ्यांनी काम केली नाहीत म्हणून दोडामार्ग तालुक्यातील जनता हाल सहन करतेय. तुमच्या आकार्यक्षमतेचा रोज पंचनामा जनतेतून होतोय. म्हणूनच गेल्या निवडणुकीत तुम्हाला तालुक्यातून शुल्लक मताधिक्य मिळाल होतं. अधिकारी – कर्मचाऱ्याकडून कामं करून घेऊ शकलो नाही हे प्रामाणिकपणे कबूल करा. नवीन ढोंगबाजी थांबवून मोठ्या मनाने आमदारकीचा राजीनामा द्या. पुरे झाली आत्ता तुमची शाब्दिक सेवा चाकरी. तुमच्या फसव्या आश्वासनबाजीतून जनतेला मोकळ करा.
कोट्यावधी निधी आणला म्हणणाऱ्या केसरकरांच्या आकार्यक्षमातेचा पुरावा देण्यासाठी बांदा -दोडामार्ग आई रस्ताच पुरेसा आहे. या रस्त्याची दुरावस्था केसरकर मंत्री असल्यापासून सुरु आहे. साधा हा रस्ता दुरुस्त करणे त्यांना जमलं नाही. पालकमंत्री सामंत यांना घेऊन तालुक्यात येताना केसरकरना लाज वाटायला हवी होती. शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यालाही या रस्त्यावरून प्रवास करताना यातना होतं असतील. जे कार्यकर्ते तुमच्यासाठी राबतात रस्त्यावरून जाताना त्यांचीही बोलती बंद होतं असेल. तुमच्या कामाचा काय प्रचार करणार हे कार्यकर्ते तरी हा प्रश्न आहे.