*कोकण Express*
*कणकवली हर्णे आळीत घरांना बसला हाय होल्टेजचा झटका*
*इलेक्ट्रिक विद्युत उपकरनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान*
*कणकवली ः संजना हळदिवे*
शहरातील हर्णेआळी येथील बांदेकर घराजवळी विद्युत पोलावर हायहोल्टेजचा लोड आल्याने आसपासच्या घरांना याचा फटका बसला.यामुळे घरातील इलेक्ट्रिक विद्युत उपकरनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.हि घटना शुक्रवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली.यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.या घटनेनंतर महावितरणचे सहाय्यक निरीक्षक सचिन कुंभार व कणकवली शहर विभाग प्रमुख सागर कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीची पाहणी केली.
हाय होल्टेजच्या झटक्यामुळे धोंडी आरोलकर यांच्या घरातील दोन संगणक,४ एलडी लाईट,मिथुन ठाणेकर यांचे फ्रिज,एलडी लाईट,गौरव हर्णे – टीव्ही,लाईट,बूस्टर ,सुधीर हर्णे – पाच एलडी लाईट,संतोष ठाणेकर – एलडी लाईट तर हर्णे यांच्या चाळीतील काही घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. याची माहिती येथील नागरिकांनी दिली.