*चौपदरीकरणाचा ठेका मिळूनसुद्धा काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार*

*चौपदरीकरणाचा ठेका मिळूनसुद्धा काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार*

*कोकण Express*

*चौपदरीकरणाचा ठेका मिळूनसुद्धा काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार*

*मंत्री नितिन गडकरी यांचे प्रमोद जठार यांना आश्वासन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई गोवा हायवेचे जे कंत्राटदार निविदा मिळुन सुद्धा ​अजूनही काम सुरु करीत नाहीत त्यांची कामे काढून घेऊन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.तसे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत.चिपळूण ते राजापूर असा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा पुर्ण केल्यानंतर सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीत मुंबई गोवा हायवेच्या समस्या जास्त असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना दिली असता चर्चेदरम्यान ठरकेदारांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला होता.

श्री गडकरी यांच्या भेटीनंतर माहिती देताना श्री जठार म्हणाले, संगमेश्वर शहरात होत असलेले जास्तीचे भूसंपादन थांब​वून पुन्हा पुलाचे आराखडे तयार करण्यात यावेत अशी मागणी जनतेची ​असून त्याचे निवेदन देण्यात आले ​असून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी श्री गडकरी यांच्याकडे करण्यात आली.तसेच मुंबई गोवा हायवेचे जे कंत्राटदार निविदा मिळुन सुद्धा ​अजूनही काम सुरु करीत नाहीत त्यांची कामे त्वरित ​काढून घेऊन त्यांना जनतेच्या अडचणीत भर घातल्याबद्दल व सरकारी कामात दिरंगाई केल्याबद्ल दंड लावावा व तो वसुल करुन जनकल्याणासाठी वापरावा अशी मागणी केली. त्यांवर श्री गडकर यांनी आपण सुद्धा आता त्यांच निष्कर्षास आलो असुन दोन दिवसात आढावा बैठक घेऊन कारवाईचा दणका या कंत्राटदरांना देण्याचे संकेत दिले व संगमेश्वर ​शहरवासीयांना सुद्धा न्याय देण्याचे मान्य केल्याची माहिती श्री जठार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!