*कोकण Express*
*कुडाळ भाजपा पदाधिका-यांनी घेतली नारायण राणेंची भेट*
*कुडाळ ःप्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि सौ. नीलम राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले .यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे, महिला मोर्चा जिल्हासरचिटणीस सौ.रेखा काणेकर, कुडाळ सभापती सौ. नूतन आईर, तालुकाध्यक्ष दादा साईल, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे, रुपेश कानडे, तालुका सरचिटणीस देवेन सामंत, कुडाळ नगरसेवक सुनील बांदेकर, साळगाव सरपंच उमेश धुरी, तुळसुली सरपंच नागेश आईर, बाव सरपंच नागेश परब आदी उपस्थित होते . सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री म्हणून निवड झाली. हा क्षण केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. नारायण राणे यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कालावधी कमी असला तरी त्यांचा धडाकेबाज, दूरगामी दृष्टिकोन आणि त्यांचा राजकीय अनुभव यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अतिशय चांगली कामगिरी करून देशाला, आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना नक्कीच न्याय देतील, असा विश्वास या मंडळींनी व्यक्त केला. कोकण आणि महाराष्ट्र राज्यातील मत्स्य, फळप्रक्रिया, पर्यटन, खादी आणि ग्रामोद्योग तसेच इतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग करणाऱ्या उद्योजकांना या खात्याच्या माध्यमातून आणखी चांगल्या संधी येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर अभियानाला यामुळे खऱ्या अर्थाने गती प्राप्त होईल, असे मंत्री राणे यावेळी म्हणाले.