*कोकण Express*
*केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली भेट,दिल्या शुभेच्छा..!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांची दिल्ली येथे जाऊन भाजपा नेते आणि महराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली व उद्योगमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विकासा बाबत चर्चा झाली. सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.एकूणच राज्याच्या विकासात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे याचे महत्वपूर्ण योगदान राहणार आहे.काल गृमंत्री अमित शाह,जे पी नड्डा, नितीन गडकरी या नेत्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.