*कोकण Express*
*इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी १ वाजता होणार जाहीर*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल याबद्दलची माहिती लवकरच जाहीर करू, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ साली एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस पात्र ठरले. त्यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ इतकी आहे. एकूण आठ माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
―――――
जाहिरातीसाठी संपर्क – 9421563257
――――――
*कोकण Express* चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप वर मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/KaE4TWCaLUU7eYnIF5oPht