*कोकण Express*
*देवगडड तालुक्यात युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कोविड योद्धा, वायरमन यांचा सत्कार*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने आज कोविड योद्धाचा सत्कार समारंभ प्रा.आ..केंद्र फणसगाव आयोजित करण्यात आला होता. कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा केलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,तसेच तौक्ते वादळात देवगड तालुक्यात मोठे नुकसान होऊन पडझड झाली होती, त्या प्रसंगी वीज वेळेत चालू केल्याबद्दल महावितरणचे सर्व वायरमन, तालुक्यातील प्रत्येक गावा गावात सामान्य कार्यकर्त्यांनी सुध्दा भरीव योगदान देऊन आरोग्य यंत्रणेला चांगले सहकार्य करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना जि प सदस्य प्रदीप नारकर,उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम वैद्यकीय,अधिकारी पल्लवी घोळवे,सरपंच सादिक डोंगरकर,जयेश नर,उपसरपंच, प्रदीप फाळके,हमजा सोलकर,संतोष तारी युवा सेना अध्यक्ष अमेय जठार,फरीद काझी, देवेंद्र नारकर, यांनी संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्येने कोविड योद्धे उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना युवा नेते संदेश पारकर,शिवसेना नेते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक ,सूत्रसंचालन आभार जि. प.सदस्य प्रदीप नारकर यांनी मानले