*कोकण Express*
*पंतप्रधान मोदींनी राणेंवर टाकली आणखी मोठी जबाबदारी*
*गुंतवणूक व व्यवसायविषयक महत्वाच्या मंत्रीगटात राणेंचा समावेश*
*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*
मोदींनी मंत्रिमंडळ फेररचना आणि विस्तारानंतर आज मंत्रिगटांची पुनर्रचना करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी या मंत्रिगटांच्या अध्यक्षासह सदस्यांची निवड केली आहे. यात गुंतवणूक व विकासविषयक अतिशय महत्वाच्या मंत्रिगटात राणेंचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे या समितीचे अध्यक्ष असून, राणेंसोबत नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समितीचे सदस्य आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यानी शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुमारे डझनभर खासदार दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबद्दल मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अखेर नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे.