*कोकण Express*
*पालकमंत्री उदय सामंत १४ जुलै रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बुधवार दि. १४ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा पुढीलप्रमाणे असेल ;
बुधवार १४ जुलै स. १०.४५ वा. मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स. ११.०० वा. मातोश्री मंगल कार्यालय येथे संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर तसेच शिवसेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, स. ११.४५ वा. कणकवली येथून मोटारीने ओरोस – सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दु. १२.०० जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसिकरणासंदर्भात आढावा बैठक, दु. १.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषाद, दु. २.१५ वा. ओरोस येथून मोटारीने दोडामार्ग आडाळीकडे प्रयाण, दु. ३.३० वा. तहसिलदार कार्यालय, दोडामार्ग येथे प्रादेशिक अधिकारी, एम. आय. डी. सी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग. कार्यकारी अभियंता, उपअभियंता एम. आय. डी. सी. यांच्या उपस्थितीत आडाळी एम. आय. डी. सी. आढावा बैठक, दु. ४.३० वा. मंदार हॉल, सासोली, ता. दोडामार्ग येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार दोडामार्ग येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, सोईनुसार शासकीय विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव.