*कोकण Express*
*संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचा सत्कार*
*शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटर मध्ये कार्यक्रम*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे.पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार १४ जुलै २०२१ रोजी दुपारी १२ वा हा कार्यक्रम होणार आहे.
कोरोणा महामारी विरुद्ध आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी लढत आहेत.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.