*कोकण Express*
*ईडीकडून जिल्हा बँकेला कोणतीही नोटीस नाही, ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये : सतीश सावंत*
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लि. चिमणगांव, ता. कोरेगांव जि. सातारा हा कारखाना, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई यांनी कर्ज थकित झाल्याने थकित कर्जाचे वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन अँक्टअंतर्गत जप्त करून सदर कारखान्याचा जाहीर लिलाव केला. लिलाव विक्री प्रक्रियेत मे. गुरू कमोडिटीज
सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई यांनी सहभाग घेवून जाहीर लिलावाव्दारे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांचेकडून
दिनांक २५ नोव्हेंबर २०१० रोजी खरेदी केलेला आहे. हा कारखाना खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने थेट अगर
सहभागातून कोणेताही कर्ज पुरवठा केला नसल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
मे. गुरू कमोडिटीज सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई या कंपनीकडून सदरचा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स, पुणे या प्रायव्हेट कंपनीस कारखाना चालविण्यासाठी करार पध्दतीने दिला. सदरच्या कारखान्याची क्षमता २५०० मे. टन प्रतिदिन होती ती वाढून ७००० मे. टन प्रतिदिन करण्यासाठीचा प्रस्ताव प्रकल्प मशिनरी आधुनिकरण व सहविज निर्मीती करण्यासाठी सहभागातून ‘कर्ज मिळण्यासाठी बँकेकडे दि. १४ मार्च २०१७ अन्वये कर्ज मागणी केलेली होती.
त्यानुसार सदर कारखान्यास सन २०१७ – १८ या आर्थिक वर्षापासून पुणे जिम, सह बँकेच्या सहभागातून व त्यांच्या मार्फत वितरीत केलेले आहे. या सहभागामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी जि.म.सह बँक आणि कराड अर्बन यांचा सहभाग आहे. बँकेने मशिनरी आधुनिकीकरण व सहविज निर्मीती व इथेनॉल प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केलेला आहे. बँकेने वितरीत केलेल्या सर्व प्रकारच्या वसुली अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. बँकेने दिलेल्या कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आलेले असून जून २०२१ अखेर कर्जाची वसुली नियमित सुरू असल्याच सावंत यांनी म्हटलं.
अंमलबजावणी संचनालयाने (ED) या संबंधाने बँकेकडे माहिती मागविली असून बँकेवर कोणत्याही प्रकारे
नोटीस बजावणी केलेली नसल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. सध्या राजकीय विरोधकांकडून हेतूपुरस्कर ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण करून माझी व बँकेची बदनामकारक माहिती सोशल मिडीयाद्वारे प्रसिध्द केली जाते. बँकेच्या ठेवीदारांनी अशा कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये. आपल्या सर्वांच्या ठेवी या बँकेत सुरक्षित असल्याची ग्वाही देत असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले.