*कोकण Express*
*नांदगाव व पावाचीवाडीचा संपर्क तुटला..*
*नदिने ओलांडली धोक्याची पातळी*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव पावाची वाडी येथे डामरे येथील उगम पावलेल्या नदीला पूर आला आल्याने नदिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नांदगाव पावाची वाडी येथील पुलावरून पाणी वाहू लागण्याने पावाचीवाडीचा संपर्क तुटला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे ब-याच ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने संपर्क तुटला आहे. नांदगाव पावाची वाडी येथे ही नदी पुलावरून वाहत असल्याने येथील संपर्क तुटला आहे