मिठबांव नेटवर्क समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रा.पं सदस्य परशुराम (तात्या) लोके यांनी खासदार विनायक राऊत यांची घेतली भेट

मिठबांव नेटवर्क समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रा.पं सदस्य परशुराम (तात्या) लोके यांनी खासदार विनायक राऊत यांची घेतली भेट

*कोकण Express*

*मिठबांव नेटवर्क समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रा.पं सदस्य परशुराम (तात्या) लोके यांनी खासदार विनायक राऊत यांची घेतली भेट*

*पोईप प्रतिनिधी*

मिठबांव येथे दोन बी एस एन एल टॉवर आहेत मात्र काही महिने नेटवर्क सुविधा वारंवार खंडित होत असल्याने मिठबांव ग्रामपंचायत सदस्य परशुराम (तात्या ) लोके यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदनाद्वारे नेटवर्क समस्या खासदार विनायक राऊत यांच्या निदर्शनास आणली आहे,

ऑनलाईन धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच रेशनिंग वर होणाऱ्या नेटवर्क समस्या, बँकेत निर्माण होत असलेली नेटवर्कची समस्या खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिदिली आहे,

तात्काळ सेवा सुरळीत करून मिठबांव,कातवण, तांबळडेग हिंदळे मोर्वे, बागमळा आदी भागात बीएसएनएल नेटवर्क समस्या भेडसावत असून ही समस्या त्वरित दूर करा याबाबतची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे

संबधित नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे,

या वेळी मिठबाव ग्रामपंचायत सदस्य परशूराम उर्फ (तात्या) लोके माजी ग्रामपंचायत सदस्य
प्रसाद उर्फ (छोटू) ढोके
माजी सरपंच जयाजी जोगल,
निलेश ढोके,गणेश जेठे
सागर जोगल, संकेत लोके आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!