*कोकण Express*
*सर्वपक्षीय एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू…*
*नारायण राणे; सी-वर्ल्ड व विमानतळ हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे आवाहन…*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
सर्वपक्षीय एकत्र आल्यास विकास दूर नाही.त्यामुळे आता जिल्ह्याच्या आणि पर्यायाने कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येवूया.मला मिळालेल्या मंत्रिपदाचा निश्चितच फायदा कोकणच्या विकासासाठी करेन,असा शब्द केंद्रीय लघु व मध्यम मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेले सी-वर्ल्ड व विमानतळ हे रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया,आणि वेंगुर्ला मच्छीमार्केट आधुनिक झाले तसे ही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करूया, असे त्यांनी सांगितले.वेंगुर्ला येथील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे उद्घाटन देवेंद्र फडवणीस व नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.