*कोकण Express*
*कणकवली माजी भाजपा महिला अध्यक्षा सौ. स्वाती राणे कोरोना योद्धा पुरस्कार*
*संदीप पाटील युवा मंच किसरूळकर (हंपा), प्रिती सोलर शॉपी, दुर्वा फाउंडेशन सन्मानित कोविड -१९ योद्धा सन्मान*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कोल्हापूर कोविड हेल्पलाइन (महाराष्ट्र राज्य)
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून व दीप प्रज्वलन माननीय श्री ऋतुराज पाटील, शारंगधर देशमुख, संदीप पाटील, अष्टविनायक चव्हाण,डॉक्टर वीरेश आपटे यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आली कोविड -१९ संकट काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता जिल्ह्यातील जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या कोविड योद्ध्याना कोल्हापूर कोविड हेल्पलाईन,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र कोल्हापूर दक्षिण चे युवा आमदार माननीय श्री ऋतुराज पाटील दादा यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर दक्षिनण चे युवा आमदार माननीय श्री ऋतुराज पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री.शारंगधर देशमुख गटनेता काँग्रेस महानगरपालिका कोल्हापूर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम मध्ये भारतीय जनता पक्ष माजी महिला तालुकाध्यक्षा तसेच जाणवली माजी उपसरपंचा सौ. स्वाती राणे ह्या गेलं दीड वर्ष कोरोना काळामध्ये कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोव्हिड पेशन्ट कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग मध्ये व्हेंटिलटर बेड, ऑक्सीजन बेड, प्लाझ्मा ब्लड, तसेच इतर सुविधा जिजाऊ फाऊंडेशन कोल्हापुरचे सन्माननिय श्री. सचिन तोडकर आणि या सर्व महाराष्ट्र राज्य कोरोना हेल्पलाईनचे श्री. संदिप पाटील सर तसेच श्री. वीरेषा आपटे सर तसेच सौ.स्वाती कदम यांच्या मदतीने उपलब्ध करून देत आहेत. याची दखल घेत त्यांना आज कोरोना योद्धा म्हणून कोल्हापुर येथील लोकमान्य सभाग्रूहात सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आले.
सर्व स्थरातून सौ. स्वाती राणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी बोलताना सौ. राणे म्हणाल्या कि, सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कधीही आपणांस कोणती कोरोनाच्या या काळात गरज वाटली तर आमच्याशी संपर्क करावा.
श्री़ संदीप पाटील, डॉ. विरेश आपटे, देविका पाटील, अष्टविनायक चव्हाण,स्वाती कदम, राहुल जयकर,साईदत्त सबनीस,सौरभ कपाडी, सागर ओतारी, आशिष कुलकर्णी, अमोल पाटील,सारिका पाटील, सौरभ मोलादी, सचिन लोंढे पाटील, रविराज घोडके, सोमनाथ भटनागर, संताजी पाटील, विशाल ढोबळे, ऋषिकेश जाधव,करण कारंडे, तेजश्री सावंत, स्वाती राणे, प्रसाद शिंदे , प्रवीण पाटील या सत्कारमुर्ती चे सत्कार आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करणेत आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सिद्धी मिरजकर यांनी केले तर आभार व्यक्त डॉक्टर वीरेश आपटे यांनी केले.