*कोकण Express*
*राणेंच्या जीवनात शिवसेनेचे अनन्यसाधारण महत्व*
*शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी राणेंना ” या ” शब्दांत दिल्या शुभेच्छा*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
शिवसेनेमुळे आतापर्यंत नारायण राणे यांना मंत्रीपदे मिळाली. त्यांनी मंत्रीपदाचा वापर राणेपरिवाराबरोबरच जनतेसाठी करावा. दंडवते, प्रभू यांनी देशाचे नाव एका उंच पातळीवर नेले ते राखले तरी जनता खुष होईल असा टोला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लगावला.
तळेबाजार येथे आयोजित पत्रकारपरिषदेत अतुल रावराणे बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलींद साटम, अमित साळगांवकर आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले, केंद्रीय मंत्रीमंडळात सिंधुदूर्गला मंत्रीपद मिळाले ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र या मंत्रीपदाचा वापर महाराष्ट्रातील जनतेसाठी किती होतो हे महत्वाचे आहे. नारायण राणे शिवसेनेत असताना व शिवसेना सोडल्यानंतर केलेल्या विरोधामुळे त्यांना आतापर्यंत मंत्रीपदे मिळाली.
भाजपांनी त्यांना मंत्रीपद दिल्यामुळे शिवसेनेवर दबाव नक्कीच आला नाही. उलट तावडे, मुनगुंटीवार अशी दिग्गज भाजपाचे नेतेमंडळी असताना देखिल राणेंना मंत्रीपद देणे यावरून राणेंचीच भाजपा पक्षावर जास्त पकड आहे हे अधोरेखीत झाले आह