*कोकण Express*
*युवकांनी शेतीमधून आर्थिक रोजगार निर्माण करावा – अतुल रावराणे*
*बळीराजा आत्मसन्मान योजनेंतर्गत मोफत काजूकलम, खतवाटपाचा देवगडमध्ये शुभारंभ*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
कोरोना महामारीचे संकटात अनेक युवक, तरुण वर्ग बेकार होऊन शहरातून गावाकडे आले. व त्या तरुणांच्या हाताला काम मिळावे या महत्वाकांक्षेने काजू पीक हे पारंपरिक पीक असून त्याची योग्य निगा राखली तर एक झाड ६० ते ७० किलो काजू देतो. या उत्पन्नातून येथील बेकार तरुणाला आर्थिक रोजगार निर्माण करणे हा हेतू असून या बळीराजा आत्मसन्मान योजनेतून येथील शेतकऱ्यांना काजू रोप वाटम व मोफत खत देण्यात येणार आहे या पुढील पिढीने मुंबई कडे धाव न घेता शेतीमधून आर्थिक रोजगार निर्माण करावा असे आवाहन श्री भैरी भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी तळेबाजार येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीविषयक विकासाला दिशा देणारी बळीराजा “आत्मसन्मान” योजना शुभारंभ व काजू कलम रोप वाटप श्री भैरी भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष. शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते तळेबाजार येथे करण्यात आला. यावेळी श्री भैरी भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे, माजी सभापती रवींद्र जोगल,माजी उपसभापती अमित साळगावकर,: तालुका प्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, शहर प्रमुख संतोष तारी, नगरसेविका हर्षा ठाकूर काका जेठे, महिला संघटक पूर्वा सावंत, डॉ. संतोष कोंडके, डॉ महेंद्रकर विभाग प्रमुख राजू तावडे, शाखाप्रमुख रघुनाथ साटम, उपस्थित होते. श्री भैरी भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्री शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रजवलन करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने विशेष कोरोना योद्धाचा शाल, श्रीफळ, काजू कलम रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोंडके, डॉ. अश्विनी महेंद्रकर, शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, मयुरी कुंभार, प्रतीक लोके, तसेच ५ महिला व ५ पुरुष शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात काजू रोप वाटप करण्यात आले. एकूण ५ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० काजू रोप या प्रमाणे ५० हजार काजू रोप वाटप करण्यात येणार आहेत.
सूत्रसंचालन रघुनाथ साटम यांनी करून प्रास्तविक तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी केले. कोणताही राजकीय हेतू न ठेवता शेतकऱ्यांच्या हितासाठी व उन्नतीसाठी अशा पद्धतीच्या योजना राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन स्वावलंबी बनावे असे आवाहन केले. माजी सभापती रवींद्र जोगल यांनी काजू रोप वाटप होत असताना त्या काजू रोपांचे लागवड करून शेकऱ्यांनी सक्षम बनावे असे आवाहन केले.
तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी आपल्या मार्गदर्शनात काजू रोपांचे वाटप खऱ्या अर्थाने गरीब शेतकऱ्यापर्यत पोहचवणे हा महत्वाचा उद्देश असल्याचे सांगितले.