*कोकण Express*
*ज्येष्ठ साहत्यिक, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्येष्ठ साहित्यिक , गझलकार अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष व साहित्य क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेले सिंधुदुर्गाचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रतिभावंत कवी, साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र टाईम्सला पत्रकार म्हणून कार्यरत होते.
मूळ वैभववाडी तालुक्यातील नानिवडे येथील असलेले मधुसूदन नानिवडेकर हे सध्या कणकवली तरळे येथे वास्तव्यास होत. मनमिळावू व हसतमुख स्वभावा मुळे अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता .त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्ह्याभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे