*कोकण Express*
*भाजपाच्या संघटन पर्व – २०२०अंतर्गत बुथरचना करण्याबाबत वेंगुर्ले तालुक्याची बैठक संपन्न….*
*जिल्हा बुथ रचना संयोजक महेश सारंग यांच्या उपस्थितीत बैठक पडली पार…*
*वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
मेराबुथ सबसे मजबूत हे घोषवाक्य घेऊन भाजपाची देशभरात वाटचाल सुरु आहे .त्यामुळेच कधीकाळी दोन खासदार असणारा पक्ष आज ३०२ खासदार असणारा पक्ष बनला आहे व त्यामुळेच देशातील सर्वाधिक सत्तास्थाने या संघटनात्मक योजनेमुळे पादाक्रांत केली . त्यामुळेच भाजपा मध्ये बुथला अनन्यसाधारण महत्त्व आहे , असे प्रतिपादन भाजपा जिल्हा बुथरचना संयोजक महेश सारंग यांनी वेंगुर्ले येथे बुथरचना बैठकीमध्ये केले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा चिटनीस घनःशाम ऊर्फ निलेश सामंत , जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते._
_यावेळी बुथची रचना करताना शक्ती केंद्र निहाय प्रभारी नेमण्यात आले .तसेच प्रत्येक जि प मतदार संघनीहाय जिल्हा पदाधिकारी निरीक्षक म्हणून नेमण्यात आले .तसेच प्रत्येक बुथवर बैठका घेऊन बुथकमीटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .तसेच प्रत्येक बुथकमीटी मध्ये महीला मोर्चा , युवा मोर्चा तसेच पक्षाच्या विविध आघाड्या व मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सामावून सर्वसमावेशक बुथकमीटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वेंगुर्ले तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणीकरीता पंचायत समिती मतदार संघनीहाय शक्ती केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती.भाजपा मध्ये बुथप्रमुखांमध्ये समन्वय राखण्यासाठी पंचायत समिती निहाय व नगरपरिषद हद्दीत शक्ती केंद्र प्रमुख म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते . त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती करुन नियुक्तीपत्रे देण्यात आली . शक्ती केंद्र प्रमुख म्हापण – गुरुनाथ उर्फ नाथा मडवळ, परुळे – रुपेश भालचंद्र राणे, आडेली – विष्णू भिकाजी उर्फ तात्या कोंडसकर , वायंगणी – प्रशांत खानोलकर ( प्रभारी ),तुळस – संतोष सिताराम शेटकर , मातोंड – ज्ञानेश्वर शांताराम केळजी, उभादांडा – गोविंद क्रुष्णाजी मांजरेकर