*कोकण Express*
*सोनाळी ( गावठणवाडी ) उजळली स्ट्रीट लाईटच्या झगमगाटाने*
*उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते झाले स्ट्रीट लाईटचे उद्घाटन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्याचे उपसभापती अरविंद रावराणे यांच्या सेस फंडातून १ लाख ६० हजार रूपये मंजूर करून पंचायत समितीच्या १५ व्या वित्तआयोगातून सोनाळी (गावठण वाडी) येथे स्ट्रीट लाईट बसवण्यात आली. या विद्युत स्ट्रीट लाईटचे उदघाटन आज उपसभापती अरविंद रावराणे यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी सरपंच भीमराव भोसले, पोलीस पाटील राजेंद्र रावराणे, कॉन्ट्रॅक्टर समीर कुलकर्णी, वायरमन, मुकादम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सोनाळी गावठणवाडी येथे बसवलेल्या स्ट्रीट लाइटमुळे गावठणवाडी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.