*कोकण Express*
*दैनिक लोकमतच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड येथे उमाबाई बर्वे लायब्ररीमध्ये दैनिक लोकमत तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवगड तालुका रक्तदान शिबिराची जबाबदारी लोकमतचे प्रतिनिधी अयोध्याप्रसाद गावकर यांच्याकडे देण्यात आली होती. ही जबाबदारी चोखपणे बजावून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले आहे.
या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी देवगड-जामसंडे नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष कोंडके, जिल्हा आरोग्य विभागाचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, उदयोजक नंदुशेठ घाटे, तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, किरण टेंबुलकर, गौरव पारकर, दयानंद पाटील, रुपेश खोत, अभय कुलकर्णी, नगरसेवक उमेश कणेरकर आदी उपस्थित होते.