आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  नेत्ररोग तपासणी व कान,नाक,घसा ( ENT ) संबंधित आजारांवरील शिबिर संपन्न

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  नेत्ररोग तपासणी व कान,नाक,घसा ( ENT ) संबंधित आजारांवरील शिबिर संपन्न

*कोकण  Express*

*आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  नेत्ररोग तपासणी व कान,नाक,घसा ( ENT ) संबंधित आजारांवरील शिबिर संपन्न*

*शिबीराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या हस्ते*

*सिंधुदुर्ग*

भारतीयय जनता पार्टीचे नेते आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील मांगेली तळेवाडी येथे रविवार दि.१० जुलै रोजी लाईफटाईम हॉस्पिटल पडवे व ग्रामपंचायत मांगेली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तपासणी व कान,नाक,घसा ( ENT ) संबंधित आजारांवरील शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.शिबीराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सोशल डिस्टन्शिंगच्या नियमाचे पालन करत रुग्णाची नेत्र व कान,नाक,घसा तपासणी करण्यात आली.

लाईफटाईम हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री.हरीश्चंद्र परब,डॉ.वेदक,नेत्र चिकीत्सक सुभाष जाधव यांच्या विशेष मार्गदनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मांगेली सरपंच विश्वनाथ गवस,विजय गवस व मांगेली ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.शिबीरास मांगेली तळेवाडी व फणसवाडी येथील तरुण वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरील दोनही शिबीराचा १५० जणांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!