*कोकण Express*
*देवगड जामसंडे परिसरात पर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना फक्त शुक्रवारी बसण्याची मुभा*
*नगराध्यक्षा प्रियंका साळसकर*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड जामसंडे परिसरात पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना फक्त शुक्रवारी बसण्याची मुभा दिली असून इतर दिवशी या परिसरात विक्री करण्यास मज्जाव केल्याचे नगराध्यक्षा प्रियंका साळसकर यांनी सांगितले.
नगराध्यक्षा साळसकर म्हणाल्या की स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या मागणीनुसार आम्ही परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना फक्त शुक्रवारी बसण्याची परवानगी दिली असून स्थानिक भाजी विक्रेत्यांनी प्रभागवार भाजी विक्री करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांना परजिल्ह्यातील येणाऱ्या भाजीविक्रेत्याप्रमाणेच स्थानिकांनी त्याच दरात भाजी उपलब्ध करून देण्याच्या देखील सूचना दिल्या असल्याचे देखील सांगितले. तसेच स्थानिक नागरिकांना स्वस्त भाजी मिळावी यासाठी एक दिवस परजिल्ह्यातून भाजी विक्रेत्यांना बोलावण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत असल्याने अशा प्रकारचे नियोजन नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले होते. परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना देवगड आठवडी बाजार भरतो त्या ठिकाणी न बसता नगरपंचायत प्रशासनाने सुचवून दिलेल्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आपला व्यवसाय करावा अशाही सूचना दिल्या असल्याचे देखील नगराध्यक्षा साळसकर यांनी सांगितले.