*कोकण Express*
*देवगड तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाहीची तत्वे पायदळी तुडवत भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारच्या निषेधाबाबतचे निवेदन आज देवगड तहसीलदार यांना देवगड तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही.
सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे. या सरकारचा निषेध आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. आमचे हे निवेदन जनतेशी कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे, अशी आपणास विनंती आहे. आम्ही या सरकारच्या निषेधाच्या तीव्र भावना या निवेदनाद्वारे व्यक्त करत आहोत.असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा चिटणीस जयदेव कदम बाळा खडपे, नगराध्यक्षा प्रियंका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर ,शरद ठुकरुल, वैभव करंगूटकर, योगेश चांदोसकर, डॉ अमोल तेली, संदीप साटम, सुभाष धुरी, संतोष फाटक आदी उपस्थित होते