*कोकण Express*
*वेंगुर्ले भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
भाजपाच्या निर्दोष १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करून लोकशाहीची हत्या केल्याचा महाविकास आघाडी सरकारच्या कृतीचा निषेध करुन कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना शासनापर्यत पोहचवण्यासाठी तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना – काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महावसुली आघाडी सरकारने तालीबानी पद्धतीने , लोकशाहीची नितिमुल्ल पायदळी तुडवत जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चालवत आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो .परंतु लोकशाहीच्या संकेताचे पालनही या सरकारला करता आले नाही . सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये म्हणून निर्दोष १२ आमदारांचे निलंबन करून अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे . जनतेचे कोणतेच सोयर सुतक नसलेल्या ठाकरे सरकारचा निषेध करत या भावना सरकारपर्यंत पोहचाव्यात अशी मागणी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जिल्हा का.का.सदस्य बाळा सावंत , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , शक्ती केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर केळजी व शामसुंदर मुननकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , मच्छिमार सेलचे ता.अध्यक्ष बाबा नाईक , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , विशाल सावळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .