*कोकण Express*
*देवगड तालुक्यात सर्वाधिक १०५ मि.मी. पाऊस…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०६:*
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक १०५ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी १४ मि.मी पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ११७७.२६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ०४(१२३७), सावंतवाडी – ००(१४३८.१०), वेंगुर्ला – ००(९३२), कुडाळ – ०१(१०५८), मालवण – ०१(११६४), कणकवली – ००(१२६२), देवगड – १०५(१०७८), वैभववाडी – ०१(१२४९), असा पाऊस झाला आहे.